Video : या सैनिकाने गर्लफ्रेंडला केले अनोख्या पद्धतीने प्रपोज

नुकताच व्हेलेंटाईन डे जगभरात साजरा करण्यात आला. या निमित्ताने अनेकांनी आपल्या जोडीदाराला प्रेमाची कबुली दिली. मात्र रशियातील एका सैनिकाने आपल्या गर्लफ्रेंडला हटके पद्धतीने घातलेल्या मागणीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

रशियातील एका सैनिकाने 16 युद्ध टँकद्वारे ‘हार्ट’ काढले व मधोमध गर्लफ्रेंडला उभे करत तिला मागणी घातली. या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

अलाबिनो ट्रेनिंग ग्राउंडमध्ये सैनिकाने हटके पद्धतीने गर्लफ्रेंडला प्रपोज केले. प्रपोज केल्याव सैनिक गर्लफ्रेंडला उचलून गोल फिरताना देखील दिसत आहे. हे सर्व 16 टँक टी-72बी3 आहे. अशा हटके पद्धतीने केलेल्या प्रपोजची सध्या चर्चा सुरू आहे.

या सैनिकाचे नाव डेनिस डेनिस काझंटसेव्ह असून, त्याच्या जोडीदाराच्या नाव अ‍ॅलेक्झेंड्रा कोप्यतोव्हा आहे. दोघे अनेक वर्षांपासून एकत्र आहेत. अ‍ॅलेक्झेंड्राने सांगितले की, हा क्षण खूपच भावूक करणारा होता.

Leave a Comment