पॅनकार्ड आधारसोबत लिंक करण्याची ३१ मार्चची डेडलाईन


नवी दिल्ली : पॅन कार्डला आधार कार्डसोबत ३१ मार्चपर्यंत लिंक करणे गरजेचे आहे. पॅन आधारला लिंक करण्याच्या तारखेला मुदतवाढ देण्यात आली आहे. ३० कोटी ७५ लाख लोकांनी २७ जानेवारी २०२० पर्यंत पॅन कार्डला आधारसोबत लिंक केले आहे. १७ करोड ८५ लाख पॅन कार्ड अजून सुद्धा आधारसोबत लिंक करणे बाकी आहे. पॅनकार्ड आधारसोबत लिंक करणे बंधनकारक असून ३१ मार्चपर्यंत मुदत वाढवण्यात आली होती. आधारसोबत पॅन लिंक केले नसेल तर ते करणे आवश्यक असणार आहे.

पॅन कार्ड हे जर आधार सोबत लिंक केले नाही तर पॅन कार्ड निष्क्रीय ठरवले जाणार असल्यामुळे आर्थिक व्यवहार करताना तुम्हाला अडचणी येऊ शकतात. आयकर विभागाच्या वेबसाईटवरूनही आधार-पॅन लिंक करण्याची सुविधा आहे. तुमची माहिती भरुन तुम्ही आधार आणि पॅन लिंक करु शकता.

आधार-पॅन लिंक करण्यासाठी सगळ्यात आधी आयकर विभागाची ई-फायलिंग वेबसाईट www.incometaxindiaefiling.gov.in वर जावे लागेल. त्यानंतर वेबसाईटवर तुम्हाला साईडला एक लाल रंगाचे बटण दिसेल. या बटणावर ‘लिंक आधार’ असे लिहिले असेल. जर तुमचे अकाऊंट बनले नसेल तर तुम्हाला आधी रजिस्ट्रेशन करावे लागेल. लॉगिन केल्यानंतर तुमच्या समोर एक पेज ओपन होईल. लॉगिन केल्यानंतर वर दिसत असलेल्या प्रोफाईल सेटिंगमध्ये जाऊन आधार कार्ड लिंक करण्याच्या ऑप्शनवर जा. हे ऑप्शन उघडल्यानंतर तुम्हाला आधार नंबर आणि कोड टाकावा लागणार आहे. हे भरल्यानंतर तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक होईल. त्याच बरोबर तुम्ही मोबाईलवरूनही हे करु शकता. 567678 किंवा 56161 वर एसएमएस करुन तुम्ही आधार आणि पॅन कार्ड लिंक करु शकता.

Leave a Comment