पर्यावरण प्रेमी अमित ठाकरेंचे अनोखे ‘व्हॅलेंटाईन’ सेलिब्रेशन


मुंबई : काल अनोख्या पद्धतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित राज ठाकरे यांनी ‘व्हॅलेंटाइन डे’ सेलिब्रेशन केले. आपल्या ‘व्हॅलेंटाइन डे’ सेलिब्रेशनचा फोटो त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यांच्या या सेलिब्रेशनचे कौतुक करण्यात येत आहे. तसेच त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

प्राणी प्रेमी आणि पर्यावरण प्रेमी म्हणून अमित राज ठाकरे हे ओळखले जातात. त्यामुळे ‘व्हॅलेंटाइन डे’ला त्यांनी अनोख्या पध्दतीने ‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा केला आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या प्रमाणे अमित ठाकरे हे देखील श्वान प्रेमी आहेत. त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने आज त्यांच्या घरी असणाऱ्या ‘मुफासा’ या नावाच्या त्यांच्या लाडक्या श्वानाला गुलाबाचे फुल देत ‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा केला. खूप सुंदर जोडी. प्रेमदिनाच्या हार्दिक शुभेच्छा, अशा त्यांना चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच सर्वांनी माणसांप्रमाणेच प्राणी आणि निसर्गावरही प्रेम करा, असा संदेश देण्याचा प्रयत्न आपल्या कृतीतून केला.

Leave a Comment