जगातील सर्वात महागड्या बंगल्याचा मालक झाला हा व्यक्ती


आपल्यापैकी अनेकांचे स्वतःचे हक्काचे घर असावे असे स्वप्न असते आणि त्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरु असते. त्यात काहीजण यशस्वी होतात तर काहींच्या पदरी निराशा पडते. सध्या अॅमेझॉनचे सीईओ जेफ बेझोस अशाच एका आलिशान घरामुळे प्रकाशझोतात आले आहेत.

त्यांनी तब्बल १६.५ कोटी डॉलर एवढ्या किंमतीचा लॉस एंजेलिस येथील बेवर्ली हिल्स येथे एक भव्य बंगला खरेदी केला आहे. बेझोस यांनी या भागात घर खरेदीत एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

या संदर्भातील वृत्त ‘वॉलस्ट्रीट जर्नल’ने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार व्यावसायिक डेव्हिड गेफेन यांच्याकडून बेझोस यांनी हे घर खरेदी केले आहे. लॉस एंजेलिसमध्येही या घराच्या खरेदी कराराने एक नवा विक्रम रचला आहे. सध्याच्या घडीला त्या भागातील हे सर्वाधिक महागडे घर ठरत आहे. यापूर्वी लाशन मर्डोक यांनी बेल एअर इस्टेटची खरेदी करण्यासाठी जवळपास १५ कोटी डॉलर रुपयांची किंमत मोजली होती.

मिळालेल्या माहितीनुसार बेवर्ली हिल्स परिसरात वॉर्नर इस्टेट नावाचा हा बंगला ९ एकरांच्या परिसरात उभा आहे. यामध्ये गेस्ट हाऊस, टेनिस कोर्ट आणि गोल्फ कोर्टसह इतरही सुविधा आहेत. १९३०मध्ये हे घर वॉर्नर ब्रदर्सचे माजी अध्यक्ष जॅक वॉर्नर यांनी उभे केले होते.

बेझोस यांनी १८ जुलै २०१८ला समोर आलेल्या श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये सर्व विक्रम तोडले होते. त्यांची त्यावेळी संपत्ती १५० अरब डॉलरच्याही पलीकडे पोहोचली होती. बेझोस यांना मागे टाकत २०१९ मध्ये बिल गेट्स यांनी श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अव्वलस्थानी कब्जा केला होता.

Leave a Comment