मलायकाच्या Black & White मधील हॉट अंदाजावर नेटकरी फिदा


अर्जुन कपूरसोबत असलेल्या रिलेशनशीपमुळे अभिनेत्री मलायका अरोरा ही सोशल मीडियावर चर्चेत असते. तसेच सोशल मीडियावरही मलायका चांगलीच सक्रिय असते. ती सोशल मीडियावर स्वत:चे आणि बॉयफ्रेंड अर्जुनसोबतचे फोटो शेअर करत असते. चाहतेही मलायकाच्या फोटोंना भरभरून लाईक्स आणि कमेंट्स देत असतात. सोशल मीडियावर मलायकचे हॉट फोटो, व्हिडिओ, लूक चांगलेच व्हायरल होत असतात.


नुकतेच सोशल मीडियावर मलायकाने तिचे काही फोटो शेअर केले आहेत. सोशल मीडियावर हे फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहेत. मलायकाने शेअर केलेले हे सगळे फोटो ब्लॅक अँड व्हाइट मध्ये आहेत. ‘#blacknwhiteseries’ असे मलायकाने फोटो शेअर करताना लिहिले आहे. या फोटोंकडे निरखुन पाहिल्यास हे फोटो काही वर्षापूर्वीचे असल्याचे वाटते. पण तरीही या फोटोंमधील मलायकाचा हॉट अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत. मलायकाच्या फोटोवर चाहते दिलखुलासपणे कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत.


मलायका पहिल्या फोटोत शेतात धावताना दिसत आहे. मलायकाने या फोटोमध्ये घातलेल्या पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये तिला ब्युटी इन ब्लॅक अँड व्हाइट म्हणणे चुकीचे ठरणार नाही. तर शेवटच्या फोटोमध्ये ती एकदम स्टायलिश ड्रेसमध्ये दिसत आहे. मलायकाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असल्यामुळे मलायकाचे हे black and white मधील फोटोही सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.

Leave a Comment