हॉटेलचे रुपांतर परमिट रुममध्ये केल्यास व्यवसाय वाढतो – गुलाबराव पाटील


जळगाव : युवकांना रोजगारासंदर्भात मार्गदर्शन करताना शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांनी हॉटेलचे रुपांतर परमिट रुममध्ये केल्यास व्यवसाय वाढतो असे धक्कादायक वक्तव्य केले आहे. माझा व्यवसाय परमिट रुममुळे वाढल्याचे उदाहरण देखील त्यांनी यावेळी दिले.

जळगाव येथे जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात त्यांना स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी अर्थसहाय्य उपलब्ध व्हावे यासाठी प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. पाणीपुरवठा तथा स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या या मेळाव्याचे उद्घाटन हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित विद्यार्थी बेरोजगार तरुणांसमोर मार्गदर्शन करताना हॉटेलचे परमिट रूममध्ये रुपांतर केल्यास व्यवसाय चार पटीने जोरात चालतो, असे धक्कादायक वक्तव्य केले आहे.

मी स्वतः भाड्याने हॉटेल घेतली होती, त्यानंतर ती विकत घेतली. ते हॉटेल मी शुद्ध शाकाहारी म्हणून चालवली तर ती चालत नव्हते. मग ते हॉटेल मी मांसाहारी केली. पण मटण उरले की दुसर्‍या दिवशी खप नव्हते, अखेर मी त्या हॉटेलला परमिट रूम केले आणि मग ते हॉटेल जोरात चालू लागले.

4 हजार रुपयांचा मांसाहारी हॉटेलचा गल्ला असायचा, तोच ज्या दिवशी परमिटरूम सुरू केले त्यादिवशी 20 हजार रुपये धंदा झाला. मला सुरुवातीला असे वाटले आपण हॉटेलचा व्यवसाय चालत नव्हता, तेव्हा आपण फसलो असे वाटले. पण एकाने सांगितले की परमिट रूम चालू कर आणि महिन्याला 60 ते 70 हजार रुपये मिळायला लागले, असे धक्कादायक वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी सुशिक्षित बेरोजगार व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केली आहे.

मुद्रा कर्ज बेरोजगारांना मिळत नाही आणि मिळाले तरी त्यांना ते फेडता येत नाही. या पार्श्वभुमीवर प्रामाणिक धंदा करावा हे स्पष्ट करताना त्यांनी हे उदाहरण दिले. बेरोजगार युवकांना व्यवसायाचे प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ते बोलत होते. पण आपण त्यांचे उदाहरण चुकल्याने त्यांच्यावर टीका होत आहे.

Leave a Comment