वडिलांनी मुलीला लग्नात हुंडा म्हणून चक्क दिली 2200 पुस्तकांची भेट


अहमदाबाद : पूर्वीच्या काळी लग्नाच्यावेळी नवऱ्या मुलाला हुंडा देण्याची पद्धत होती. पण ती पद्धत आता जसा काळ बदलत गेला, तशी बदलत गेली. असे असतानाच गुजरातमधील राजकोटमध्ये वडिलांनी मुलीच्या लग्नात तिला एक मौल्यवान भेट दिली. दागिने, वाहन, कपडे अशी खरेदी मुलीच्या लग्नात केली जाते, पण त्याचबरोबर या वडीलांनी आपल्या मुलीला 2200 पुस्तके हुंडा म्हणनू भेट दिली आहेत. तिचे वडील हरदेव सिंह जाडेजा हे शिक्षक असून मुलगी किन्नरीलाही पुस्तकांचे वेड आहे. 500 पुस्तकाचे वाचनालयही त्यांच्याकडे आहे.

जेव्हा वडोदरामधील इंजिनिअर पूर्वजीत सिंह याच्याशी किन्नरीचे लग्न ठरले, तिने तेव्हा वडिलांना सांगितले, माझ्या लग्नात हुंड्याऐवजी पुस्तके दिली तर मला खूपच आनंद होईल. वडिलांनी मुलीची ही मागणी पूर्ण करण्याचे ठरवले. कशा पद्धतीने ही पुस्तके दिली जावीत हे ठरवणेही सोपे नव्हते. सुरुवातीला हरदेव सिंह यांनी आपल्या मुलीच्या आवडत्या पुस्तकांची यादी तयार केली. त्यानंतर जवळजवळ 6 महिने फक्त त्यांनी पुस्तकांसाठी दिल्ली, काशी आणि बंगळुरूसह अनेक शहरांचे दौरे केले आणि पुस्तके गोळा केली. यामध्ये महर्षि वेद व्यास यांच्यासारख्या ऋषीतुल्य लेखकांसह मान्यवर लेखकांच्या पुस्तकांसमावेत यामध्ये कुराण, बायबलसह 18 पुराणही आहेत.

Leave a Comment