गेल्या ७ वर्षांच्या कालावधीत एका भिकाऱ्याने मंदिराला दान दिले तब्बल ८ लाख रुपये


विजयवाडा: गेल्या ७ वर्षांच्या कालावधीत एका मंदिराला आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील एका मंदिरात भीक मागणाऱ्या एका ७३ वर्षीय भिकाऱ्याने ८ लाख रुपयांचे दान दिले आहे. भिकारी मंदिराला दान दिल्यामुळे आपल्या उत्पन्नात वाढ झाल्याचेही म्हणाला. भिकाऱ्याच्या या दानशूरपणाची मंदिर प्रशासनानेही प्रशंसा केली आहे. एका गोशालेची निर्मिती भिकाऱ्याने दिलेल्या दानातून करण्यात येणार असल्याचे मंदिर प्रशानसाने सांगितले.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, यादी रेड्डी असे या ७३ वर्षीय भिकाऱ्याचे नाव आहे. यादी रेड्डी भिकारी होण्यापूर्वी सुमारे ४० वर्षे रिक्षा ओढण्याचे काम करत होते. पण गुडघ्यांचा त्रास सुरू झाल्यानंतर त्याच्याकडे कोणताही पर्याय न उरल्याने त्यांना मंदिराबाहेर बसून भीक मागणे सुरू करावे लागले.

तब्बल ४० वर्षे रिक्षा ओढण्याचे काम मी केले. मी सर्वप्रथमी पहिल्यांदा एक लाख रुपये साईबाबा मंदिराच्या अधिकाऱ्यांना दान स्वरुपात दिल्याचे रेड्डी यांनी माहिती देताना सांगितले. माझी तब्येत बिघडू लागल्यानंतर मला अधिक पैशांची गरज भासू लागली. म्हणूनच मंदिराला अधिक पैसे दान करण्याचा मी निर्णय घेतला. या पुण्याईने माझी मिळकत वाढेल असे मला वाटत होते, असे रेड्डी म्हणाले.

रेड्डींनी आपल्या दानशूरतेबाबत माहिती देताना सांगितले की, मंदिराला दान देणे मी सुरू केल्यानंतर माझे उत्पन्न वाढू लागले. मंदिराला दान देत गेल्यामुळे लोक मला ओळखू लागले. आतापर्यंत मंदिराला मी ८ लाख रुपयांचे दान दिले आहे. मंदिराला मी माझी सर्वच कमाई दान देणार आहे. मंदिराचा रेड्डी यांच्यामुळे चांगला विकास होऊ लागला असल्याचे मंदिर प्रशासनाचे म्हणणे आहे.

मंदिरासाठी आम्ही कुणाकडेही दान मागत नाही, पण काही लोक स्वेच्छेने मंदिराला दान देतात, असे साईबाबा मंदिर प्रशासनाचे एका अधिकाऱ्याने सांगितले. या अधिकाऱ्याने रेड्डी यांनी केलेल्या दानाचे तोंड भरून स्तुती केली. आम्ही येथे रेड्डी यांनी दिलेल्या दानातून एक गोशाला उभारणार असल्याचेही तो अधिकारी म्हणाला.

Leave a Comment