राम शिंदेंनी दाखल केलेल्या याचिकेमुळे रोहित पवारांना औरंगाबाद खंडपीठाची नोटीस


औरंगाबाद – औरंगाबाद खंडपीठाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार रोहित पवार यांना नोटीस पाठवली असुन आमदार रोहित पवार यांना ही नोटीस माजी मंत्री राम शिंदे यांनी केलेल्या निवडणूक याचिकेवर बजावण्यात आली आहे. माजी मंत्री राम शिंदे यांनी निवडणूक लढताना गैरप्रकार केला असल्याचा आरोप करत रोहित पवार यांच्या विरोधात औरंगाबाद खंडपीठात निवडणूक याचिका दाखल केली. मंगळवारी औरंगाबाद खंडपीठाने त्यावरून रोहित पवार यांना नोटीस बजावली आहे.

विधानसभा निवडणुकी दरम्यान मतदारांना लाच देणे, राम शिंदे यांची बदनामी करणे निवडणूक खर्चाचे तपशील लपवणे आणि या सर्वांचा आधार घेऊन निवडणुकीत रोहित पवारांनी विजय मिळवला, असा आक्षेप शिंदे यांनी घेतला आहे. त्याचबरोबर प्रचारासाठी जामखेड कर्जत मतदारसंघात बारामती ऍग्रो लिमिटेडचे कर्मचारी यांना आणले होते. घरोघरी जाऊन हे कर्मचारी मतदारांना प्रभावित करत होते आणि एक हजार रुपयाची लाच देत होते, असाही आरोप राम शिंदे यांनी केला आहे. त्यासोबतच निवडणूक खर्च देखील रोहित पवार यांनी दडपून ठेवला, असाही आरोप करण्यात आला आहे. यावरून औरंगाबाद खंडपीठाने रोहित पवार यांना नोटीस पाठवली आहे. पुढील सुनावणी 13 मार्च रोजी आहे.

Leave a Comment