रेनॉल्टने सादर केली आपली पिटुकली इलेक्ट्रिक कार ‘ट्विझी’

ऑटो एक्स्पो 2020 मध्ये एकापेक्षा एक सरस अशा कार सादर करण्यात आल्या. यावेळी अनेक कंपन्यांनी आपल्या कॉन्सेप्ट इलेक्ट्रिक कार देखील सादर केल्या. यातीलच रेनॉल्टची एक छोटीशी कार सर्वांच्या चर्चेचा विषय ठरली.

रेनॉल्टने ऑटो एक्स्पोमध्ये आपली पिटुकली इलेक्ट्रिक कार रेनॉल्ट ट्विझी (Renault Twizy) सादर केली. या छोट्याशा कारमधून एकच व्यक्ती प्रवास करू शकतो. ही एक कॉन्सेप्ट कार आहे.

Image Credited – autocarindia

रेनॉल्ट ट्विझी एक इलेक्ट्रिक कॉन्सेप्ट कार आहे. त्यामुळे कंपनी ही कार लाँच करेल की नाही, हे सांगणे अवघड आहे. या पिटुकल्या कारची चार्जिंग सिस्टम याची खास गोष्ट आहे. यामध्ये तुम्हाला सिंपल चार्जिंग पिन मिळते. ज्याद्वारे तुम्ही कोणत्याही नॉर्मल सॉकेटमध्ये लावून चार्जिंग करू शकता.

Image Credited – amarujala

या गाडीचे वैशिष्ट्य म्हणजे ही कार सिंगल चार्जिंगमध्ये 100 किमी अंतर पार करू शकते. या कारचे दरवाजे वरच्या दिशेने उघडतात. या कारच्या मागील बाजूला सामान ठेवण्यासाठी जागा मिळते. ज्यात तुम्ही 75 किलोपर्यंत सामान ठेऊ शकता. या कारमध्ये तुम्हाला फास्ट चार्जिंगचा देखील पर्याय मिळेल.

Leave a Comment