डिजिटल युगात सुरक्षित राहण्यासाठी 5 महत्त्वाच्या टिप्स

आज मोबाईलच्या एका क्लिकवर जगभरात कोणाशीही संवाद साधणे सोपे झाले आहे. याच बरोबर सोशल मीडिया, बँकिंगची कामे पासून ते एखादे तिकीट बुक करण्यासाठी सर्वचजण इंटरनेटचा वापर करतात. मात्र इंटरनेटच्या अधिक वापरासोबतच त्याचे अनेक धोके देखील निर्माण झाले आहेत. डिजिटल जगात वावरताना अनेकदा काळजी न घेतल्यास नुकसान होऊ शकते. 11 फेब्रुवारीला सेफर इंटरनेट डे अर्थात इंटरनेट सुरक्षा दिन पार पडतो. या निमित्ताने ऑनलाईन जगात सुरक्षित राहण्यासाठी काही टिप्स जाणून घेऊया.

Image Credited – VPNbase

सुरक्षित पासवर्ड आणि टू फॅक्टर ऑथेंटिकेशन –

तुमच्या डिव्हाईसला किंवा तुम्ही जेथेजेथे लॉग इन करता त्याला सुरक्षित पासवर्ड असणे गरजेचे आहे. सोशल मीडिया कंपन्या देखील अतिरिक्त सुरक्षेसाठी टू फॅक्टर ऑथेंटिकेशनची सुविधा देखील देते. या सुविधेचा नक्की वापर करावा.

Image Credited – onlinebooksreview

स्पॅम, घोटाळा, फिशिंगपासून सावधान –

एखादी अनोळखी लिंक, मेसेज, वेबसाईटचे पॉप-अप्स यापासून सावधान रहावे. हॅकर्स एखादा मेसेज अथवा लिंक पाठवून तुमची खाजगी माहिती चोरी करतात व तुमच्या खात्यातील पैसे काढून घेऊ शकतात. आलेला प्रत्येक ईमेल योग्य व्यक्तीकडून आला आहे की स्पॅम आहे याचा देखील तपास करा.

Image Credited – West Coast Technical

कूकीजवर लक्ष –

जर तुम्हाला तुमचा डेटा सुरक्षित ठेवायचा असेल, तर ब्राउजिंग कुकीजवर नेहमी लक्ष ठेवा. या कुकीजच अन्य साईट्सला तुमची माहिती देतात. प्रायव्हेसी टूल तुमच्या कुकीजवर लक्ष ठेवतात. याशिवाय तुम्ही ब्राउजर्सच्या सिक्यूरिटी फीचर्सचा देखील वापर करू शकता. यामूळे तुमचा डेटा लीक होणार नाही.

Image Credited – Quora

वेबसाईट सिक्योर आहे की नाही –

कोणत्याही वेबसाईटवर गेल्यावर त्याचे यूआरएल नक्की तपासा. सुरक्षित वेबसाईट्सच्या यूआरएलची सुरूवात https पासून होते. जर तुम्हाला यूआरएलमध्ये केवळ http दिसले तर त्या साईटपासून सावधान रहा.

Image Credited – CSO

जाहिरात –

तुमच्या डिव्हाईसमध्ये व्हायरस असल्याची माहिती देणाऱ्या जाहिरातींवर आजिबात लक्ष देऊ नका. हॅकर्स अशा जाहिरातींच्या माध्यमातून युजर्सला लक्ष्य करतात. तुम्ही जर अशा जाहिरातींवर क्लिक करून माहिती दिली, तर तुमचे नुकसान होऊ शकते.

Leave a Comment