गोपीचंद यांना आयओसीचा कोच लाईफटाईम अचिव्हमेंट पुरस्कार


देशाचे बॅडमिंटन कोच पुल्लेला गोपीचंद यांची इंटरनॅशनल ऑलिम्पिक समितीने २०१९च्या कोच लाईफटाईम अचिव्हमेंट पुरस्कारासाठी पुरुष गटात निवड केली आहे. गोपीचंद माजी ऑल इंग्लंड चँपियन आहेत आणि भारतात बॅडमिंटन खेळाडू घडविण्यासाठी आणि बॅडमिंटन विकासासाठी त्यांनी मोठे योगदान दिले आहे. भारतीय ऑलिम्पिक पदक विजेती सायना नेहवाल, ऑलिम्पिक रजत पदक विजेती पीव्ही सिंधू, किदंबी श्रीकांत असे अनेक स्टार खेळाडू त्यांच्या तालमीत तयार झाले आहेत.

आयओसीने या संदर्भात एक पत्रक जारी केले असून कोच लाईफटाईम अचिव्हमेंट पुरस्कारासाठी गोपीचंद यांची निवड होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. हा पुरस्कार सोहळा लवकरच होत असल्याचे त्यात नमूद केले गेले आहे. त्यात गोपीचंद यांनी बॅडमिंटनचा प्रसार, विकास, खेळाडू सहयोग, ऑलिम्पिक मुव्हमेंटसाठी मोठे योगदान दिल्याचा उल्लेख केला गेला आहे.

Leave a Comment