संभाजी भिडेंविरोधात बेळगावमध्ये अटक वॉरंट


कोल्हापूर : 13 एप्रिल 2018 रोजी दिवशी बेळगाव जवळील येळ्ळूर या गावात महाराष्ट्र मैदानावर कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी शिवप्रतिष्ठान या संघटनेचे संस्थापक आणि सर्वेसर्वा संभाजी भिडे हे प्रमुख पाहुणे होते.

भिडे यांनी आचारसंहिता लागू असतानाही महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना निवडून द्यावे, असे विधान आपल्या भाषणातून केल्यामुळे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी संभाजी भिडे यांच्यासह नऊ जणांवर बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. आता त्यानुसार शिवप्रतिष्ठान या संघटनेचे संस्थापक आणि सर्वेसर्वा संभाजी भिडे यांच्या विरोधात बेळगावमध्ये अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे.

पण संभाजी भिडे आत्तापर्यंत झालेल्या सगळ्या सुनावणीवेळी गैरहजर राहिल्याने त्यांच्याविरोधात अटक वारंट जारी करण्यात आले आहे, दरम्यान येत्या 24 मार्चला या संदर्भातली पुढची सुनावणी होणार आहे. संभाजी भिडे हे आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे या आधीही अडचणीत सापडले होते.

Leave a Comment