हर्षवर्धन जाधव आणि प्रकाश महाजन यांचा मनसेत प्रवेश


मुंबई : पुन्हा एकदा मनसेचा झेंडा शिवसेनेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव आणि भाजपच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे मामा प्रकाश महाजन यांनी हाती घेतला आहे. ‘कृष्णकुंज’वर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मेगाभरती झाली.

त्याचबरोबर मनसेत औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा विश्वासू सहकारी आणि शिवसेनेचे लोकसभा सहसंपर्क प्रमुख सुहास दशरथे यांनीही प्रवेश केला. तर शिवसेनेचे नांदेडचे माजी जिल्हाप्रमुख प्रकाश कौडगे यांनीही मनसेची वाट धरली आहे.

Leave a Comment