800 रिट्विटमुळे परत मिळाली चोरीला गेलेली पर्स

अमेरिकेतील एका 21 वर्षीय युवकाने चोरीला गेलेल्या पर्सला तिच्या खऱ्या मालकीणपर्यंत पोहचवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला आहे. 21 वर्षीय युवकाने सोशल मीडियाद्वारे अवघ्या 16 तासात पर्सला तिच्या खऱ्या मालकीणपर्यंत पोहचवले. युवक जेम्सने हरवलेल्या पर्समध्ये सापडलेल्या गोप्रो कॅमेऱ्यामध्ये काढलेला फोटो ट्विट केला. त्याने केलेल्या फोटोला 800 पेक्षा अधिक रिट्विट आल्यानंतर अखेर पर्सची खरी मालकीण सापडली. सोशल मीडियावर पर्सचा फोटो व्हायरल झाल्यानंतर एका युजरने पर्सची मालकीण सारा योबला ओळखले.

सारा फ्लोरिडाची आहे. 23 वर्षीय साराची पर्स न्यू ऑर्लेंअंस येथे चोरीला गेली होती. ती कॉलेज फुटबॉल स्पर्धेसाठी न्यू ऑर्लेअंस येथे आली होती. पर्समध्ये काही डॉलर, सेलफोन आणि एक नेकलेस होता. सारा यावेळी फ्रेंच क्वाटरमध्ये थांबली होती.

जेम्सला देखील पर्स फ्रेंच क्वाटरमध्येच सापडली. पर्समध्ये काहीही ओळखीचा पुरावा नव्हता. त्याने पर्सचा फोटो ट्विट करत या पर्ससोबत कोणाला पाहिले का ? हे देखील विचारले. ही पर्स तिच्या मालकीणपर्यंत पोहचवण्यासाठी मदत करा, असेही त्याने ट्विटरवर लिहिले. 16 तासात या ट्विटला 800 पेक्षा अधिक रिट्विट आले व पर्सची खरी मालकीण सापडली.

योबने देखील ट्विट करत हरवलेली पर्स मिळाल्याबद्दल जेम्सचे आभार मानले.

Leave a Comment