राजमौलीच्या RRRसाठी अजय देवगणने घेतले धक्कादायक मानधन


या वर्षाची सुरुवात बॉलीवूडचा सिंघम म्हणजेच अभिनेता अजय देवगणने धमाकेदार केली. बॉक्स ऑफिसवर त्याचा या वर्षातील पहिला चित्रपट ‘तान्हाजी’ ब्लॉकबस्टर ठरला आहे. बॉक्स ऑफिसवर तान्हाजीला इतर चित्रपटांची टक्कर असतानाही ओम राऊत दिग्दर्शित हा चित्रपट चौथ्या आठवड्यातही चांगली कमाई करत आहे. अजय या चित्रपटानंतर दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या ‘RRR’ चित्रपटात झळकणार आहे. अजय ‘तान्हाजी’च्या यशानंतर ‘RRR’साठी किती मानधन घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.

अजयसोबत ‘RRR’ चित्रपटात जूनियर एनटीआर आणि राम चरण मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. अजय देवगणला त्यांच्या इतकेच मानधन देण्यात येणार होते. पण अजयने या चित्रपटसाठी मैत्री खातर कोणत्याच प्रकारचे मानधन घेतले नाही. यासंदर्भातील वृत्त नवभारत टाईम्सने दिले आहे.

‘ईगा’ चित्रपटाच्या सेटवर अजय देवगण आणि राजामौली यांची मैत्री झाली होती. राजामौली यांनी ‘ईगा’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. तसेच त्यांचे वडिल के. वी. विजेंद्र यांनी या चित्रपटाची कथा लिहिली होती. तेलुगू आणि तामिळमध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट ‘मक्खी’ या नावाने हिंदीमध्ये डब करण्यात आला. या चित्रपटाला अजय आणि काजोलने व्हॉइस ओवर दिला.

राजामौलींच्या ‘RRR’ या चित्रपटात अजय देवगण, राम चरण, ज्युनिअर एनटीआर आणि अभिनेत्री आलिया भट्ट मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. राम चरण आणि ज्युनिअर एनटीआर चित्रपटात स्वातंत्र सैनिकांची भुमिका साकारणार असून आलिया भट्ट आणि अजय देवगन सहाय्यक कलाकार असणार आहेत. हा चित्रपट ८ जानेवारी २०२१प्रदर्शित होणार असून हा चित्रपट तेलगू, तामिळ, हिंदी, मल्याळम आणि इतर प्रादेशिक भाषांमध्ये देखील प्रदर्शित होणार आहे.

Leave a Comment