वादग्रस्त फोटो-व्हिडीओ शेअर केल्यास ट्विटर देणार चेतावणी

सोशल मीडियाच्या माध्यमातून खोट्या बातम्यांचा मोठा प्रसार होतो. सोशल मीडिया कंपन्या देखील अशा खोट्या बातम्या, हिंसा दर्शवणाऱ्या पोस्ट रोखण्यासाठी अनेक पाऊले उचलत असतात. आता मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरने देखील एक खास फीचर सादर केले आहे.

या फीचरनंतर कोणत्याही एडिट केलेल्या फोटो अथवा व्हिडीओला रिट्विट करताना ट्विटरच त्याबद्दल चेतावणी देईल. हे खास फीचर 5 मार्च 2020 पासून रोलआउट होईल.

ट्विटरने सांगितले की, लवकरच प्लॅटफॉर्मवर ट्विटचे लेबलिंग केले जाईल. याद्वारे मोडून तोडून माहितीचा प्रसार करणारी माहिती देण्यात येईल. सोबतच चुकीची माहिती देणारे ट्विट देखील हटवले जातील.

ट्विटर ही चुकीची माहिती देणाऱ्याला देखील आधी चेतावणी देण्यात येईल. याचा उद्देश खोटी माहिती प्रसारित करणारे ट्विट रोखणे हा आहे.

कंपनीने आपल्या ब्लॉगमध्ये सांगितले की, कोणत्याही ट्विटमध्ये देण्यात आलेली माहिती चुकीची अथवा छेडछाड केलेली आहे, असे वाटल्यास ट्विटवर याबाबतची माहिती दिली जाईल. अशा ट्विटर एक प्रकारचे टॅग लावले जातील. असे ट्विट लाईक अथवा रिट्विट करण्याआधी युजर्सला चेतावणी दिली जाईल.

Leave a Comment