विकी कौशलच्या आगामी ‘भूत’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज


नुकताच अभिनेता विकी कौशलची मुख्य भूमिका असलेल्या बहुप्रतिक्षित ‘भूत’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लुक आणि पोस्टर रिलीज केल्यानंतर चाहत्यांना चित्रपटाच्या ट्रेलरची उत्सुकता लागुन राहिली होती. आता ट्रेलरनंतर चाहत्यांची या चित्रपटाबद्दलची उत्सुकता शिगेला पोहचेल यात शंका नाही.

‘हॉन्टेड शिप’चा थरार चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतो. नेमके काय त्या जहाजामध्ये घडलेले असते, याचा शोध घेण्यासाठी निघालेला विकी कौशल कसा भुताच्या जाळ्यात अडकतो, याची भयावह झलक या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आली आहे.

या चित्रपटात विकी कौशलसोबत भूमी पेडणेकर देखील झळकणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन भानू प्रताप सिंग यांनी केले आहे. तर, या चित्रपटाची करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शन अंतर्गत निर्मिती करण्यात आली आहे. हा चित्रपट २१ फेब्रुवारीला रिलीज होणार आहे.

Leave a Comment