राज ठाकरेंच्या भेटीसाठी कृष्णकुंजवर कुणाल कामरा


मुंबई: सोमवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्याचा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने प्रयत्न केला. कुणाल कामरा कृष्णकुंजवर ‘Shut Up Ya Kunal’ या आपल्या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी आल्याचे वृत्त आहे. याबद्दलची माहिती कुणालने ट्विटरवर फोटो शेअर करून दिली. कुणाल कामराचा कृष्णकुंज निवासस्थानाबाहेरील फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कुणाल कामराच्या हातात यामध्ये एक पत्र दिसत आहे.

या पत्रात लिहले आहे की, तुमच्याबद्दल मी माहिती शोधली. तुम्हाला तेव्हा किर्ती कॉलेजचा वडापाव असतो, हे मला समजले. मी त्यामुळे तुम्हाला लाच द्यायला वडापाव आणला आहे. जेणेकरून तुम्ही माझ्या ‘शटअप यार कुणाल’ या कार्यक्रमासाठी याल, असे कुणाल कामराने या पत्रात म्हटले आहे.


इंडिगो एअरलाईन्सच्या विमानात काही दिवसांपूर्वी कुणाल कामराने पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्याशी आक्षेपार्ह वर्तन केल्यामुळे कुणाल कामरावर इंडिगो एअरलाईन्स, एअर इंडिया, स्पाईस जेट या विमान कंपन्यांनी बंदी घातली होती. या सगळ्या वादामुळे सध्या कुणाल कामराचे नाव प्रचंड चर्चेत आहे.

दरम्यान, आता कुणालच्या या कार्यक्रमाचे निमंत्रण मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वीकारणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) ९ फेब्रुवारीला बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना देशातून हाकलवून लावण्याच्या मागणीसाठी मोर्चा काढणार आहे.

Leave a Comment