या विमानतळावर प्रवाशांना आराम करण्यासाठी ‘कॅप्सूल’ची सुविधा

चीनच्या जेझियांग प्रांतातील होंगझोऊ आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांसाठी 8 कॅप्सूल (गोलाकार छोटी खोली) रेस्ट चेंबर ठेवण्यात आले आहेत. प्रवासी यात आराम करु शकतील. या कॅप्सूलमध्ये आधुनिक सुविधा आहेत. यात आराम करण्यासाठी एक मोठी आणि आरामदायी खुर्ची आहे. मोबाईल, लॅपटॉप चार्जिंगसोबत इंटरनेटची देखील सुविधा आहेत.

विमानतळ अधिकाऱ्यांनी सांगितले की एक कॅप्सूल तीन वर्ग मीटरचे आहे. क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर याचे गेट उघडते.

होंगझोऊ आंतरराष्ट्रीय विमानतळावरील या कॅप्सूल कॅबिनला ‘एअरपॉड’ नाव देण्यात आलेले आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे यात बसण्यासाठी एक आरामदायी खुर्ची आहे, जी बटन दाबल्यावर बेडच्या आकाराची होती. या प्रकारचे कॉन्सेप्ट आधी यूरोपियन महासंघाच्या विमानतळावर देखील वापरण्यात आलेले आहे.

या रेस्टमध्ये तुमच्या बॅग्ज् आणि इतर गरजेचे सामान ठेवण्यासाठी देखील जागा आहे. याशिवाय विमानाची माहिती घेण्यासाठी यातून बाहेर पडण्याची देखील गरज नाही. इंटरनेटमुळे यातच सर्व माहिती मिळते.

याशिवाय यात हाय स्पीड इंटरनेट, एअर फ्रेशनर, एअर कंडिशनर आणि पॉवर सॉकेट सारख्या सुविधा देखील आहेत.

Leave a Comment