जातीय भेदभाव केल्यामुळे ‘शादी डॉट कॉम’ वादात


लंडन : आपला जीवनसाथी निवडण्यासाठी अनेक भारतीयांना सर्वात मोठी मॅट्रिमोनियल वेबसाईट शादी डॉट कॉम ही मदत करते. पण आता भारतातील ही प्रमुख मॅट्रिमोनियल वेबसाईट आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या वेबसाईटवर जातीय भेदभाव केल्याचा आरोप ब्रिटनमध्ये करण्यात आला आहे. अनुसूचित जातीच्या (एससी) समाजासह भेदभाव केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

यासंदर्भातील वृत्त संडे टाइम्सने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार उच्च जातीच्या व्यक्तीच्या प्रोफाइलवर अनुसूचित जातीच्या व्यक्तीचा पर्याय तोपर्यंत येत नाही, तो जोपर्यंत व्यक्ती इतर सर्व जातींचा पर्याय निवडत नाही, असा आरोप करण्यात आला आहे.

जातीय भेदभाव भारतात बेकायदा असून मॅट्रिमोनियल वेबसाईटने केलेला जातीय भेदभाव म्हणजे ब्रिटनच्या समानता कायद्याचे उल्लंघन होऊ शकते. असा इशारा एका वकिलाने दिला आहे. पण जातीय भेदभाव केल्याच्या आरोपाचे शादी डॉट कॉमने खंडन केले आहे. कारण समुदायासाठी असलेली सेंटिग भेदभावपूर्ण नसल्याचे वेबसाईटने म्हटले आहे.

संडे टाइम्सला वेबसाईटच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, कोणत्याही कायद्याचे आम्ही उल्लंघन करत नाही. कोणत्याही समाज किंवा जातीय भेदभाव आमची वेबसाईट करत नाही. व्यक्तीचा समाज किंवा जात कोणतीही असो, प्रत्येक व्यक्तीला समान संधी दिली जाते.

Leave a Comment