तुम्ही पाहिला आहे का अनिल कपूरचा डॅशिंग अवतार?


आपल्या चाहत्यांमधील उत्साह वाढवण्यासाठी अभिनेता अनिल कपूरने मलंग चित्रपटातील डॅशिंग अवतारातील पोस्टर रिलीज केले आहे. इन्स्टाग्रामवर अनिल कपूर यांनी हे पोस्टर शेअर केले आहे. काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या मलंग चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला.


या चित्रपटाचे मोहीत सुरीने दिग्दर्शन केले असून या चित्रपटात अनिल कपूर आणि कुणाल खेमू यांच्याही महत्वपूर्ण भूमिका असून हा चित्रपट ७ फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. अनिल कपूर याच्यासोबतच ‘मलंग’ या चित्रपटात आदित्य रॉय कपूर, दिशा पटनी आणि कुणाल खेमू यांच्या प्रमुख भूमिका आहेत. भूषण कुमार, लव रंजन, अंकुर गर्ग आणि जय शेवाकरमानी या चौघा निर्मात्यांनी मिळून याची निर्मिती केली आहे. ‘आशिकी २’ या चित्रपटाच्या निर्मितीनंतर मोहित सुरी सहा वर्षानंतर भूषण कुमार यांच्यासोबत काम करीत आहेत.

Leave a Comment