शाहरुख कन्येच्या पार्टीचे फोटो व्हायरल


भलेही सिनेसृष्टीपासून भलेही बॉलिवूडचा किंग खान शाहरुखची मुलगी सुहाना चार हात लांब असली तरी ती सोशल मीडियाच्या माध्यमातून कायम चर्चेत असते. आपल्या सोशल मीडियावरुन ती नेहमी स्वतःचे फोटो शेअर करीत असते. तिच्या चाहत्यांची संख्याही मोठी आहे.

View this post on Instagram

@suhana.khan.officiall

A post shared by Suhana khan (@suhana_khan_officiall) on


तिचा एक फोटो सध्या तिच्या चाहत्यांमध्ये कमालीचा उत्सुकतेचा विषय झाला आहे. हा फोटो एका पार्टीतील असून सुहाना खान तिच्या मैत्रीणींसह एन्जॉय करताना दिसत आहे. सध्या अमेरिकेतील न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीत सुहाना शिक्षण घेत आहे. सुहाना खानचा हा फोटो तिच्या फॅन क्लबने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.


या फोटोवर भरभरुन प्रतिक्रिया येत आहेत. पदवीपर्यांतचे शिक्षण सुहानाने पूर्ण केले असून सध्या ती अमेरिकेत उच्च शिक्षण घेत आहे. तिला रुपेरी पडद्यावर पदार्पण करण्याची इच्छा असल्याचे तिने बोलून दाखवली असली तरी शाहरुखने तिला शिक्षण पूर्ण करण्याचा सल्ला दिला होता. शिक्षण पूर्ण झाल्यावर ती सिनेक्षेत्रात येईल याची प्रतिक्षा तिचे चाहते करीत आहेत.

Leave a Comment