पुणे पोलिसांनी झिरवली ‘खानसाब’ची मस्ती


पुणे : जशी जगभरात पुणेरी स्टाईल आणि भाषेची चर्चा असते, त्याचप्रमाणे पुणे पोलिसांनी केलेले ट्विट देखील चर्चेत असते. सोशल मीडियावर पुणे पोलिसांचे मजेशीर ट्विट कायमच व्हायरल तर होत असतात. त्याचबरोबर त्याच्या माध्यमातून एक संदेशही दिला जातो. सध्या सोशल मीडियावर असेच एक पुणेरी स्टाईल ट्विट व्हायरल होत आहे. पुणे पोलिसांनी यात हेल्मेट न घातलेल्या ‘खान साब’च्या फॅन्सी नंबर प्लेटची मस्करी केली. त्याचबरोबर त्यांच्यावर आवश्यक ती कारवाई करण्यासही सांगितले.


एका युझरने पुणे पोलिसांनी टॅग कर ट्विटरवर हेल्मेट न घातलेल्या मुलाचा फोटो पोस्ट केला. पुणे पोलिसांनी, यावर खान साबलाही कूलही व्हायचे आहे, हेअर स्टाईलपण दाखवायची आहे, हिरोसारखी बाईकही चालवायची आहे, पण खान साबला वाहतुकीचे नियम पाळायचे नाही, असे कसे चालेल?, अशी मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे.

लोकांनी हे ट्विट व्हायरल झाल्यानंतर विविध मिम्स आणि प्रतिक्रिया करण्यास सुरुवात केली आहे. यावर एका युझरने, मला हसू आवरता येत नाही आहे. कितीचा दंड भरावा लागला याला?, हे देखील ट्विट करायला हवे होते. गरीब नवाब संपूर्ण नवाबी होत आहेत आणि आता त्याची नवाबगिरी एका फोटोने निघाली बाहेर, अशी प्रतिक्रिया दिली आहे. आतापर्यंत बर्‍याच लाईक्स आणि 2 हजाराहून अधिक प्रतिक्रिया पुणे पोलिसांच्या या ट्विटला मिळाल्या आहेत. अनेकांनी पुणे पोलिसांच्या या ट्विटचे कौतुकही केले.

Leave a Comment