तुम्हीही थक्क व्हाल विकी कौशलचा ‘भूत’मधील थरारक लुक पाहून


विकी कौशलने आपल्या दमदार अभिनयाची ‘मसान’, ‘राजी’ आणि ‘द सर्जिकल स्ट्राईक’, यांसारख्या चित्रपटात झलक दाखवली असून त्याने अल्पावधितच प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. तो आता ‘भूत- द हॉन्टेड शिप’ या चित्रपटात थरारक भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या चित्रपटातील त्याचे काही पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले आहे.


विकी कौशलसोबत या चित्रपटात भूमी पेडणेकर देखील झळकणार आहे. विकी कौशलच्या पाठीवर भूत असल्याचे चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरमध्ये पाहायला मिळते. तर, तो दुसऱ्या एका पोस्टरध्ये भूतांच्या हातांमध्ये अडकलेला दिसतो. या पोस्टरवरून हा चित्रपट गुढ रहस्याने भरलेला असल्याचा अंदाज येतो.


या चित्रपटाचे दिग्दर्शन भानू प्रताप सिंग यांनी केले आहे. तर, या चित्रपटाची निर्मिती करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शन अंतर्गत करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच धर्मा प्रोडक्शनच्या सोशल मीडिया पेजवरही एक व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. या व्हिडिओत ‘द डार्क टाईम्स बिगिन नाऊ’, अशा ओळी पाहायला मिळाल्या होत्या. हा चित्रपट २१ फेब्रुवारीला रिलीज होणार आहे.

Leave a Comment