अशी आहे ‘अ‍ॅथर 450एक्स’ शानदार इलेक्ट्रिक स्कूटर

बंगळुरुची इलेक्ट्रिक वाहन कंपनी अ‍ॅथर एनर्जीने आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर ‘अ‍ॅथर 450एक्स’ लाँच केली आहे. ही स्कूटर 450एक्स+ आणि 450एक्स प्रो या दोन व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आले आहे. जुलै 2020 पासून स्कूटरची डिलिव्हरी सुरु होईल.

या स्कूटरची एक्स शोरूम किंमत 99,000 रुपये ठेवम्यात आली आहे. मात्र दिल्लीत या स्कूटरची किंमत 85,000 रुपये आहे.

Image Credited – Amarujala

अ‍ॅथर 450एक्समध्ये 2.9kwh बॅटरी पॅक देण्यात आला आहे. स्कूटरमध्ये 6kW ची इलेक्ट्रिक मोटर असून, जी 8बीएचपी पॉवर व 26 एनएम टॉर्क जनरेट करते.

फूल चार्जिंगमध्ये ही स्कूटर 116 किमी अंतर पार करू शकते. स्कूटरमध्ये राइड आणि ईको असे दोन ड्रायव्ह मोड देण्यात आलेले आहेत. ईको मोडमध्ये 85 किमी तर राइड मोडमध्ये 75 किमीपर्यंत स्कूटर चालू शकते.

Image Credited – Amarujala

450एक्स मध्ये अँड्राईड बेस्ड यूजर इंटरफेस देण्यात आला आहे. यात डार्क मोड आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी फीचर देखील मिळतील. ज्याद्वारे चालक मोबाईलवर येणारे कॉल उचलू शकतील.

जुन्या मॉडेलच्या तुलनेत नवीन अ‍ॅथर 450एक्सचे वजन 11 किलोंनी कमी आहे. स्कूटरची टॉप स्पीड ताशी 85 किलोमीटर आहे. ही स्कूटर केवळ 3.3 सेंकदात ताशी 0 ते 40 किलोमीटरचा वेग पकडू शकते. ही स्कूटर मॅट ग्रे आणि मिंट ग्रीन रंगात उपलब्ध आहे.

Leave a Comment