असदुद्दीन ओवेसी यांचे अनुराग ठाकूर यांना ओपन चॅलेंज


मुंबई – भाजपे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांच्या गोळ्या घाला वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी थेट आव्हान दिले आहे. मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना अनुराग ठाकूर यांच्यावर टीका करताना असदुद्दीन ओवेसी यांनी आव्हान देत म्हटले आहे की, अनुराग ठाकूर यांना मी आव्हान देतो की, भारतातील त्या जागेचे त्यांनी मला नाव सांगावे जिथे मला गोळ्या घालणार आहेत. तिथे येण्यास मी तयार आहे. ओवेसी नागपाडा येथील आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

असदुद्दीन ओवेसी यांनी यावेळी बोलताना अनुराग ठाकूर यांना मी आव्हान देतो की, भारतातील त्या जागेचे त्यांनी मला नाव सांगावे जिथे ते मला गोळ्या घालणार आहेत. तिथे येण्यास मी तयार आहे. तुमच्या वक्तव्याने माझ्या मनात कोणतीही भीती निर्माण होणार नाही. कारण आमच्या माता आणि भगिनी देश वाचवण्यासाठी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्या आहेत.

आम आदमी पार्टी, भाजप व काँग्रेस या तीन पक्षात राजधानी दिल्लीतील आगामी विधानसभा निवडणुकीत मुख्य लढत असून, दिल्लीची सत्ता मिळवण्यासाठी तिन्ही पक्षांनी प्रचारात आपले सर्वस्व झोकून दिल्याचे चित्र सध्या आहे. केंद्रीय राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी भाजपचे उमेदवार मनीष चौधरी यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेत वादग्रस्त घोषणा दिली होती. अनुराग ठाकूर यांनी रिठला विधानसभा क्षेत्रात झालेल्या या सभेत भाषण करताना ‘देश के गद्दारों को..’ अशी घोषणा केली. त्यानंतर सभेला उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी ‘गोली मारो *** को’ अशी घोषणाबाजी केली होती. अनुराग यानंतर उपस्थितांना मोठ्या आवाजात या घोषणा देण्याचे आवाहन केले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची देखील या सभेला उपस्थिती होती.

Leave a Comment