नक्की काय आहे ‘बिटिंग द रिट्रीट’ सोहळा ?

26 जानेवारीला भारताचा 71 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात देशभरात साजरा करण्यात आला. त्यानंतर दरवर्षी 29 जानेवारीला दिमाखदार बिटिंग द रिट्रीट सोहळा पार पडतो. अनेकांना हा सोहळा काय असतो माहिती नाही. हा बिटिंग द रिट्रीट सोहळा नक्की काय आहे ? हे जाणून घेऊया.

केव्हा होते बिटिंग द रिट्रीटची सुरुवात ?

26 जानेवारीला परेडद्वारे जगाला आपली ताकद दाखवल्यानंतर 29 जानेवारीला होणाऱ्या बिटिंग द रिट्रीट सोहळ्याची सगळेजण वाट पाहत असतात. रायसीना रोडवर राष्ट्रपती भवनासमोर याचे प्रदर्शन होते.

Image Credited – Jagran

बिटिंग द रिट्रीट सोहळ्याला एकप्रकारे प्रजासत्ताक दिनाचा समापन समारोह म्हटले जाते. हे सैन्याचे बैरक्समध्ये (सैन्य निवासस्थान) परतण्याचे प्रतीक मानले जाते. हा सोहळा इंग्रजांच्या काळापासून होत आहे. बिटिंग द रिट्रीट सोहळा दिल्लीच्या विजय चौक येथे आयोजित केला जातो. यावेळी राष्ट्रपती भवनाला रंगीबेरंगी लाइटींनी सजवण्यात येते.

बिटिंग द रिट्रीट सोहळ्याचा वेळ –

या सोहळ्याचा सुरुवात 29 जानेवारीला सुर्यास्त झाल्यानंतर होते. हा सोहळा पाहण्यासाठी हजारो लोक येतात.

26 जानेवारीला परेडमध्ये चालणारे उंट बिटिंग द रिट्रीट सोहळ्यात देखील सहभागी होतात. यावेळी हे उंट रायसीना हिलच्या उत्तर आणि दक्षिण भागावर उभे असतात.

Image Credited – Jagran

1976 मध्ये पहिल्यांदा 90 उंटांची तुकडी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचा भाग झाले होते. ज्यात 54 उंट सैनिकांसोबत आणि इतर बँडच्या जवानांसोबत होते. परेड व बिटिंग द रिट्रीट सोहळ्यात सहभागी होणाऱ्या उंटांना पायापासून ते मानेपर्यंत सजवण्यात येते. त्यांच्या बीएसएफचे जवान शाही वेशात बसतात.

वेगवेगळा गणवेश –

या उंटांच्या तुकडीचा वापर वेगवेगळ्या सोहळ्यांसाठी केला जात असल्याने त्यामुळे त्यांच्याकडे 65 गणवेश उपलब्ध आहेत. परदेशी राजकीय नेते आल्यावर वेगळा गणवेश आणि प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी वेगळा गणवेश परिधान करतात.

या उंटावर बसणाऱ्या जवानांची उंची देखील 6 फूट अथवा त्यापेक्षा अधिक असते. या उंट बटालियनचे देखील एक वैशिष्ट्य असते. या उंटावर बसवण्यात आलेल्या जवानांच्या मिशा देखील वेगळ्या असतात, ज्यामुळे त्यांची ओळख होते.

Image Credited – Jagran

या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे राष्ट्रपती असतात. याचे मुख्य आकर्षण तिन्ही सैन्याचे जवान एकत्र येत सामुहिक बँडचा कार्यक्रम सादर करतात. या कार्यक्रमात ड्रमर एबाइडिड विद मी हे संगीत वाजतात. यानंतर रिट्रीटचे बिगूल वाजते व बँड मास्टर राष्ट्रपतींकडे बँड परत घेऊन जाण्याची परवानगी मागतात. यानंतर सोहळ्याचे समापन होते.

बँड मार्च परत जाताना सारे जहां से अच्छा या गाण्याचे संगीत वाजते. अखेर राष्ट्रगीत गायले जाते व प्रजासत्ताक दिनाचा औपचारिक समापन होते.

Leave a Comment