यंदाच्या आयपीएलमध्ये ‘या’ दोन नवीन नियमांची अंमलबजावणी


नवी दिल्ली – २९ मार्चपासून आयपीएलच्या १३व्या हंगामाला सुरुवात होणार असून २४ मे रोजी मुंबईत अंतिम सामना खेळवण्यात येईल. आयपीएलच्या १३ व्या हंगामादरम्यान झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. अजून दोन महत्वाचे निर्णय या बैठकीत घेण्यात आले.

आयपीएलमध्ये यंदा पहिल्यांदाच कन्कशन सबस्टिट्युट (Concussion Substitute) आणि थर्ड अंपायर नोबलच्या नियमांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. कन्कशन सबस्टिट्युट म्हणजे कोणत्याही खेळाडूला सामन्यादरम्यान दुखापत झाली तर तो मैदानाबाहेर जाऊ शकतो आणि त्याच्या बदल्यात दुसऱ्या खेळाडूला संधी मिळू शकते.

तर, आता स्पर्धेत प्रथमच नो बॉलच्या नियमामध्ये मैदानावरील पंचांच्या जागी हा निर्णय तिसरा पंच घेईल. त्याची चाचणी भारत आणि वेस्ट इंडीज एकदिवसीय मालिकेत घेण्यात आली होती. आयपीएलपूर्वी बीसीसीआय चॅरिटी ऑल स्टार्स सामना खेळेल. यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू असणार आहेत. पण, सामन्याचा निर्णय अद्याप झालेला नाही. हा सामना अहमदाबाद येथे होणार नाही, कारण तेथे स्टेडियमचे काम अजूनही सुरू असल्याचे गांगुलीने म्हटले आहे. आयपीएलच्या १३ व्या हंगामात डे-नाईट सामन्याची वेळ ८ ऐवजी ७.३० करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. पण, हा प्रस्ताव बैठकीत फेटाळण्यात आला आहे. यामुळे सर्व सामने ८ वाजता सुरुवात होतील.

Leave a Comment