हॉलीवूडपटाच्या हिंदी रिमेकमध्ये ऋषी कपूरसह झळकणार दीपिका पादुकोण


सध्या ‘छपाक’ या चित्रपटामुळे चर्चेत असलेल्या दीपिका पादुकोणने आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. हॉलिवूडच्या ‘द इन्टर्न’चा तिचा आगामी चित्रपट हिंदी रिमेक असेल. दीपिकासह या चित्रपटात ऋषी कपूर यांचीही महत्त्वाची भूमिका असेल. दीपिकाने या चित्रपटासाठी उत्साहित असल्याचे म्हटले आहे.


आपल्या इन्स्टाग्रामवरुन दीपिकाने ही घोषणा केली आहे. ट्विटरवरुन ही माहिती ऋषी कपूर यांनीही दिली आहे. पुढचा प्रवास ‘द इन्टर्न’चा हिंदी रिमेक असेल. यात सोबतीला दीपिका पादुकोण असेल, असे कॅप्शन त्यांनी दिले आहे.

सध्या दीपिकाचा ‘छपाक’ हा चित्रपट चर्चेत आहे. अॅसिड हल्ल्यात वाचलेल्या महिलेची ही संवेदनशील कथा आहे. समिक्षक आणि प्रेक्षकांनी या चित्रपटाला भरपूर प्रेम दिले. गेल्या वर्षभरपासून ऋषी कपूर रुपेरी पडद्यापासून दूर होते. आजारपणासाठी ते अमेरिकेत उपचार घेऊन परतले आहेत आणि ते आपल्या चित्रपटासाठी पुन्हा सज्ज झाले आहेत.

Leave a Comment