मनपा आयुक्त तुकाराम मुंढेंनी पहिल्याच दिवशी घेतली अधिकाऱ्यांची शाळा


नागपूर – आज मंगळवारी आपल्या पदाचा नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कार्यभार स्वीकारला असून तुकाराम मुंढे हे पदाचा कार्यभार स्वीकारताच अ‍ॅक्शन मोडमध्ये असल्याचे पहायला मिळाले. राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच त्यांची नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी बदली केली होती.

तुकाराम मुंढेंनी कार्यभार स्वीकारताच आपल्या कामाला सुरूवात केल्याचे पहायला मिळाले. पहिल्याच दिवशी त्यांनी अधिकाऱ्यांसमवेत ५० मिनिटांची एक बैठकही घेतली. त्याचबरोबर त्यांनी कार्यालयात उशिरा पोहोचणाऱ्या कर्मचाऱ्यांना खडेबोल सुनावल्याची माहिती मिळाली आहे. बैठकी दरम्यान, कोणत्याही अधिकाऱ्याचे फोन वाजता कामा नये. त्याचबरोबर नियमांचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करावे, अशा सुचनाही त्यांनी दिल्या. बैठकीनंतर ते आपल्या पुढील कामासाठी रवाना झाले. दरम्यान, कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठी वापरात येणाऱ्या पंचिंग मशीनमध्ये बिघाड झाल्याने कार्यालयात येणाऱ्या कर्मचाऱ्यांची एकच तारांबळ उडाल्याचे पहायला मिळाले.

Leave a Comment