मराठी सिनेसृष्टीत नेहा कक्करचे पदार्पण, गायले रिंकूसाठी गाणे


अभिनेत्री रिंकु राजगुरुच्या आगामी ‘मेकअप’ चित्रपटाच्या ट्रेलरला आणि ‘गाठी गं’ या गाण्याला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून नुकतेच या चित्रपटातील ‘कसे निराळे हे करार प्रेमाचे’ हे गाणे रिलीज करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या गाण्याद्वारे बॉलिवूडची आघाडीची गायिका नेहा कक्कर मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे.

तिचा भाऊ टोनी कक्करने संगीत दिलेल्या या गाण्याला नेहा कक्करने स्वरबद्ध केले असून हे गीत मंगेश कांगणे यांनी लिहिले आहे. या गाण्यात प्रेमात दुखवल्या गेलेल्या भावना मांडण्यात आल्या आहेत. या सपरेल गाण्याला चाहत्यांनी उत्सफुर्त प्रतिसाद दिला आहे.

येत्या ७ फेब्रुवारीला गणेश पंडित लिखित दिग्दर्शित ‘मेकअप’ हा चित्रपट रिलीज होणार आहे. सोहम रॉकस्टार एंटरटेनमेंट, बाला इंडस्ट्रीज अँड एंटरटेनमेंट प्रा. लि., शेमारू एंटरटेनमेंट लि. आणि ग्रीन अ‌ॅपल मीडिया प्रस्तुत या चित्रपटाचे निर्माता दीपक मुकूट, बी. बालाजी राव, हिरेन गाडा, नीरज कुमार बर्मन, अमित सिंग आहेत तर केतन मारू, कलीम खान सहनिर्माता आहेत. ‘मेकअप’ या चित्रपटात रिंकू राजगुरू आणि चिन्मय उदगीरकर यांच्या व्यतिरिक्त प्रतीक्षा लोणकर, मिलिंद सफई, राजन ताम्हाणे, सुमुखी पेंडसे, स्वाती बोवलेकर, तेजपाल वाघ यांच्याही भूमिका आहेत.

Leave a Comment