हे सेलिब्रेटी कपल विकत घेऊ शकतात अनेक देश


एका प्रतिष्ठित मासिक GQ इंडियाने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी तसेच बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या कमाईचा खुलासा केला आहे. आपापल्या क्षेत्रात दोघांचेही मोठे नाव असल्यामुळे त्यांच्या चाहत्यांचे कायमच त्यांच्याकडे लक्ष असते. कसोटी आणि एकदिवसीय क्रमवारीत विराट कोहली हा जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे, तर अनुष्का शर्मा देखील चित्रपट जगातील सर्वात यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे. विराट कोहली अगदी 2019 च्या सर्वात श्रीमंत सेलिब्रिटींच्या फोर्ब्सच्या यादीत अव्वल स्थानावर होता, तर या यादीत अनुष्का शर्मा 21 व्या स्थानावर आहे.

GQ इंडियाच्या अहवालानुसार, सन 2019 मध्ये विराट कोहलीने एकूण 252.72 कोटी रुपये कमावल्यानंतर त्याची एकूण कमाई 900 कोटी रुपयांवर गेली आहे. त्याचवेळी, गेल्या वर्षी अनुष्का शर्माने 28.67 कोटी रुपये कमावले. आता तिची एकूण कमाई 350 कोटी रुपये झाली आहे. म्हणजे सुमारे 1200 कोटींची विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी मिळून कमाई केली. विराट कोहलीची कमाई त्याची पत्नी अनुष्का शर्मापेक्षा जवळपास तीन पट जास्त आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इंडियन प्रीमिअर लीगच्या टीम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून विराट कोहलीला 17 कोटी रुपये मिळतात. यामुळे तो आयपीएलमधील सर्वात महागड्या खेळाडूंपैकी एक आहे. बीसीसीआयकडून त्याला 7 कोटी रुपये पगार मिळतो. या व्यतिरिक्त जाहिरातींद्वारे तो आपली सर्वाधिक कमाई करतो. मायन्ट्रा, उबर, ऑडी, एमआरएफ, मनावर, टिझोट, वन 8, पुमा या ब्रँडसाठी विराट कोहली जाहिरात करतो. त्याचबरोबर कोहली दोन रेस्टॉरंटचा देखील मालक आहे.

प्रत्येक चित्रपटासाठी अनुष्का शर्मा सुमारे 12 ते 15 कोटी रुपये मानधन घेते. आतापर्यंत एकूण 19 चित्रपट तिने केले आहेत. तिच्याकडे क्लीन स्टेट नावाचे स्वत: चे प्रॉडक्शन हाऊस देखील आहे, ज्याची सुरुवात तिने आपल्या भावासोबत 2014 मध्ये केली होती. मान्यवर, मायन्ट्रा, श्याम स्टील, रजनीगंधा, कॉक्स अँड किंग्ज, निवा, पॅन्टेन, स्टँडर्ड चार्टर्ड बँक, गुगल पिक्स, ईएल 18 अशा ब्रँडसाठी अनुष्का जाहिरात करते.

Leave a Comment