रेड कार्पेटवर बोल्ड लूकमध्ये अवतरली देसी गर्ल


लॉस एंजेलिसमध्ये 62 व्या ग्रॅमी अवॉर्ड्सचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बॉलीवूडची देसी गर्ल अर्थात प्रियंका चोप्रा आपला पती निक जोनससोबत या पुरस्कार सोहळ्यात सामील झाली होती.

View this post on Instagram

This guy. #Grammys2020

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on


प्रियंकाचा ग्लॅमरस लूक यादरम्यान रेड कार्पेटवर पाहायला मिळाला. डिझायनर राल्फ रूसोचा गाउन प्रियंकाने घातला ज्याची नेकलाइन खूप डीप होती. या गाउनसोबत तिने स्टेटमेंट ईयररिंग्स घातले होते. गोल्ड सूटमध्ये निक क्लासी दिसला. प्रियंकाने निकसोबतचे आपले फोटो इंस्टाग्रामवरही शेअर केले आहेत.

View this post on Instagram

Tassel fun. #grammys

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on


बेस्ट पॉप डुओ/ग्रुप परफॉर्मन्स कॅटॅगरीमध्ये निकला त्याचे भाऊ केविन आणि जो जोनससोबत गायलेले गाणे ‘सकर’ साठी नॉमिनेशन मिळाले. याव्यतिरिक्त जोनस ब्रदर्स ‘व्हाट ए मॅन गोट्टा डू’ आणि ‘फाइव्ह मोर मिनट्स’ यांसारख्या गाण्यांवर परफॉर्म केले. प्रियंका, सोफी टर्नर आणि डॅनियल जोनससोबत यादरम्यान प्रेक्षकांच्या रांगेत बसून जोनस ब्रदर्सला चीअर करताना दिसली.


रेड कार्पेटवरील प्रियंकाच्या बोल्ड लुकला अपिअरन्स सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या. काहींना तिचा हा लूक आवडला तर काहींनी तिला ट्रोल केले. एका यूजरने लिहिले, ही जेव्हा बॉलिवूडमध्ये असते तेव्हा उत्तम कपडे घालते. आणखी एका यूजरने लिहिले, अतिशय वाईट ड्रेस. आणखी एका यूजरने लिहिले, हा ड्रेस खूपच खराब आहे.

Leave a Comment