विवाहबद्ध झाली पहिली ट्रान्सजेंडर महिला पत्रकार


ट्रान्सजेंडर लोकांना एका वेगळी ओळख निर्माण करून देऊन, एक मोठा ऐतिहासिक सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला होता. त्यानुसार पहिली ट्रान्सजेंडर महिला पत्रकार हैदी सादिया विवाहबंधनात अडकली. हैदी सादियाने केरळमधील एर्नाकुलम येथे अथर्व मोहनशी लग्न केले. हैदी ही केरळमधील विशेष विवाह कायद्यांतर्गत लग्न केलेले चौथी ट्रान्सजेंडर महिला आहे.

मोठ्या संख्येने लोक सादियाच्या लग्नाला उपस्थित होते. हा विवाह सोहळा एर्नाकुलममध्ये मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. हैदी सादिया ही केरळमधील पहिली ट्रान्सजेंडर पत्रकार आहे, कैराली न्यूज टीव्हीद्वारे तिने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती.

31 ऑगस्ट 2019 रोजी सादियाने पत्रकार म्हणून औपचारिक पदार्पण केले. तिच्या कारकिर्दीत तिच्यावर पहिल्यांदा चांद्रयान-2 चा प्रवास कव्हर करण्याचे काम देण्यात आले होते. तिने तिची ही पहिली असाइनमेंट यशस्वीरीत्या पूर्ण केली होती. सादिया त्यावेळी म्हणाली होती, मला फार आनंद होत आहे की, आता लोक एलजीबीटी समुदायाच्या लोकांनाही त्यांच्या ऑफिसमध्ये जागा देत आहेत.

त्रिवेंद्रम इन्स्टिट्यूट ऑफ जर्नलिझममधून इलेक्ट्रॉनिक मिडियामधून पोस्ट ग्रज्युएशन पूर्ण केल्यावर, एका टीव्हीमध्ये इंटर्न म्हणून सादिया रुजू झाली. चॅनेलने एका आठवड्यानंतर तिचे काम पाहून तिला वरची पोस्ट देऊ केली. पालकांनी स्वीकारण्यास नकार दिल्याने, वयाच्या 18 व्या वर्षी सादियाने आपले घर सोडले. त्यानंतर एका ट्रान्सजेंडर व्यक्तीने तिचा सांभाळ केला. तर अथर्व हा सूर्य आणि ईशान या ट्रान्सजेंडर जोडीचा दत्तक मुलगा आहे.

Leave a Comment