तारा सुतारियाच्या मालदीव व्हेकेशनचे फोटो व्हायरल


अभिनेत्री तारा सुतारियाने स्टुंडट ऑफ द ईयर या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर ती सिद्धार्थ मल्होत्रासोबत नुकत्याच रिलीज झालेल्या मरजावां चित्रपटात झळकली होती. तारा सध्या मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे.


सोशल मीडियावर कायम सक्रिय असणाऱ्या ताराने नुकतेच आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर आपल्या मालदीव व्हेकेशनचचे फोटो शेअर केले आहेत. ताराच्या या फोटोंवर तिचे सर्वच चाहते घायाळ झाले असून तिच्या तिच्या फोटोंची सोशल मीडियावरही चर्चा होत आहे. तिने शेअर केलेल्या ब्लॅक बिकिनीमधील फोटोंवर तिचे सगळे चाहते आकर्षित होत आहेत. यामध्ये ती खूपच हॉट दिसत आहे


‘स्टुडंट ऑफ द ईयर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या ताराचा या क्षेत्रात कोणीही गॉडफादर नाही. मात्र तरीही तिने बॉलिवूडमध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. तारा लवकरच ‘तडप’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ती सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टीसोबत या चित्रपटात स्क्रीन शेअर करणार आहे.

Leave a Comment