व्हॉट्सअ‍ॅप नंतर आता या लोकप्रिय अ‍ॅपमध्ये येणारा डार्क मोड

सोशल मीडिया साइट फेसबुक आपल्या युजर्ससाठी अनेक खास फीचर लाँच करत असते. काही दिवसांपुर्वीच कंपनीने आपल्या मालकीचे इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपमध्ये डार्क मोड फीचर दिले आहे. कंपनीने व्हॉट्सअ‍ॅपच्या अँड्राईड बीटा युजर्ससाठी हे खास फीचर रोल आउट केले आहे. आता लवकरच फेसबुकमध्ये देखील डार्क मोड फीचर येणार आहे.

फेसबुक मागील काही महिन्यांपासून आपल्या प्लॅटफॉर्मवर डार्क मोड फीचर टेस्ट करत आहे. मात्र आता लवकरच सर्व युजर्ससाठी हे फीचर लाँच होण्याची शक्यता आहे.

रिपोर्टनुसार, फेसबुक काही युजर्सच्या बीटा व्हर्जनसाठी डार्क मोड जारी करू शकते. त्यानंतर हळूहळू सर्व युजर्ससाठी हे फीचर रोल आउट केले जाईल.

व्हॉट्सअ‍ॅपने देखील डार्क मोड फीचर रोल आउट केले आहे. मात्र अद्याप हे फीचर केवळ बीटा व्हर्जनसाठीच उपलब्ध आहे.

Leave a Comment