मराठवाड्याच्या पाणी प्रश्नासाठी पंकजा मुंडे करणार उपोषण


मुंबई : भाजपच्या वतीने माजी मंत्री पंकजा मुंडेंच्या नेतृत्वात औरंगाबादेत २७ जानेवारीला सकाळी १० वाजता दुष्काळाशी सामना करत असलेल्या मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्याच्या प्रश्नासाठी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी दिली आहे.

माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर या उपोषणात सहभागी होणार आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत कोअर कमिटीच्या बैठकीत लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Leave a Comment