रतन टाटांच्या तरुणपणातील फोटोवर फिदा नेटकरी

उद्योगपती रतन टाटा सध्या आपल्या एका फोटोमुळे चर्चेचा विषय ठरले आहेत. रतन टाटांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर स्वतःचा एक जुना फोटो शेअर केला आहे. त्यांनी #ThrowbackThursday सह हा फोटो शेअर करत, आपल्या फॉलोवर्सला जुन्या दिवसांची एक झलक दाखवली. रतन टाटांनी काही महिन्यांपुर्वीच इंस्टाग्रामवर एंट्री केली आहे.

82 वर्षीय रतन टाटा यांचा हा फोटो खूप जुना आहे. तेव्हा ते परदेशात रहायचे. हा फोटो शेअर करत त्यांनी लिहिले की,  मी हा फोटो बुधवारी शेअर करणार होतो. मात्र मला समजले की थ्रोबॅक फोटो गुरूवारी शेअर केले जातात. लॉस एंजिलेसमधील हा माझ्या जुन्या दिवसातील एक फोटो. यानंतर काही दिवसांनी मी भारतात परत आलो.

1962 मध्ये भारतात परत येण्याआधी रतन टाटा यांनी लॉस एंजिलेसमध्ये जोन्स आणि एममन्स यांच्यासोबत काम केले होते.

टाटांचा हा फोटो व्हायरल होत असून, आतापर्यंत 3 लाखांपेक्षा अधिक लाईक्स आले आहेत. तर हजारो युजर्सनी यावर कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने कमेंट्समध्ये लिहिले की, धन्यवाद सर तुम्ही भारतात परत आला. तर अन्य युजरने लिहिले की, तुम्ही नेहमीच स्मार्ट आहात.

Leave a Comment