नक्की काय आहे जगात दहशत पसरवणारा ‘कोरोना’ व्हायरस?

चीनमध्ये सध्या एक नवीन व्हायरसने (विषाणू) हाहाकार उडवला आहे. मेडिकल सायन्समध्ये मनुष्य याआधी कधीच अशा व्हायरसचा शिकार झालेला नाही. या व्हायरसला कोरोना व्हायरस असे म्हटले जात असून, आतापर्यंत अनेकांना या व्हायरसचा संसर्ग झाला आहे. तर चीनमध्ये 15 पेक्षा अधिक जणांचा या व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे.

कोरोना व्हायरसमुळे ताप, खोकला, घशात वेदना, श्वास घेण्यास अडचण इत्यादी समस्या येतात. हा व्हायरस कशामुळे पसरत आहे, हे अद्याप समजू शकले नाही.

कोरोना व्हायरस हा व्हायरसचा एक विस्तृत समूह आहे. मेडिकल सायन्समध्ये आतापर्यंत केवळ 6 कोरोना व्हायरसाचा शोध लागला आहे. त्यामुळे या नवीन व्हायरसच्या शोधामुळे आता यांची संख्या 7 झाली आहे. या व्हायरसला nCoV नावाने देखील ओळखले जाते. या आधी कोणत्याही व्यक्तीला या व्हायरसने ग्रासले नव्हते.

चीनमधील वुहान क्षेत्रातील लोकांवर या व्हायरसचा सर्वाधिक परिणाम झाला आहे. हा व्हायरस जलचर जीव अथवा वन्य प्राण्यांच्या बाजारातून मनुष्यापर्यंत पोहचला असण्याची शक्यता आहे. वैज्ञानिक या व्हायरसवर उपचारासाठी वॅक्सिनचा शोध घेत आहेत.

चीनमध्ये आतापर्यंत जवळपास 200 पेक्षा जास्त जणांना या व्हायरसचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. चीनशिवाय दक्षिण कोरिया आणि थायलँडमध्ये देखील काही प्रकरण समोर आली आहेत. चीनमध्ये या व्हायरसचा प्रसार होऊ नये म्हणून विशेष काळजी घेण्यात येत आहे. सी-फूड खाणे काही काळ थांबवावे असेही सांगण्यात येत आहे.

जगामध्ये अनेक असे व्हायरस आहेत, जे क्रॉस स्पिशीज ट्रांसमिशनमुळे पसरले आहेत. यामध्ये एचआयव्ही, बर्ड फ्लू, स्वाइन फ्लू, इबोला हे सर्वाधिक धोकादायक व्हायरस आहेत.

Leave a Comment