काळ्या बिकनीत हिना पांचाळने लावली आग


‘बिग बॉस मराठी’मुळे महाराष्ट्रातील प्रत्येक घरात पोहोचलेली हिना पांचाळ हे मराठी रसिकांसाठी ओळखीचे नाव आहे. दाक्षिणात्य सिनेसृष्टीत हिना ही जास्त लोकप्रिय असली तरी आपल्या हॉट अदांमुळे ती कायम चर्चेत असते. दाक्षिणात्य सिनेसृष्टीची मलायका अरोरा अशी तिची ओळख आहे.


हीनाची ‘बिग बॉस मराठी सिझन २’ मधील पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री म्हणून घरात झाली होती. तिने आपल्या अदा ‘बिग बॉस मराठी’च्या घरात दाखवून वेगळा ठसा उमटवला. सध्या एक सुपरहॉट फोटोशूट हिनाने केले आहे. या फोटोंमध्ये तिने काळी बिकिनी घातली आहे.


तिने या फोटोला कॅप्शन देताना, बिकिनी परिधान केल्यानंतर जीवन खुलते, असे म्हटले आहे. अनेक आयटम साँगवर हिनाने नृत्य केले आहे. हुक्का, मोहल्ला, बेबो बेबो, राजू ओ राजू, बोगन असे आयटम नंबर तिने केले आहेत. फोर्ब्स इंडियाच्या २०१५ च्या ‘Top 100’ सेलिब्रिटी यादीत हिना पांचाळच्या नावाचा समावेश होता.

Leave a Comment