या सरकारने जारी केले जगातील सर्वात छोटे सोन्याचे नाणे

स्विर्झलँडच्या सरकारने जगातील सर्वात छोटे सोन्याचे नाणे जारी केले आहे. या नाण्याचा व्यास जवळपास 2.96 मिलीमीटर (0.21 इंच) आहे. तर वजन 0.063 ग्रॅम आहे. हे नाणे एवढे छोटे आहे की, याला पाहण्यासाठी मॅग्नीफाइंग ग्लास देण्यात येत आहे. नाण्याच्या एका बाजूला महान वैज्ञानिक अल्बर्ट आइनस्टाइन यांचे चित्र आहे, ज्यात ते जीभ दाखवत आहे.

स्विर्झलँडच्या राष्ट्रीय टाकसाळने हे नाणे तयार केले आहे. या नाण्याचे मुल्य एक चतुर्थांश फ्रँक ठेवण्यात आलेले आहे. हे नाणे ऑनलाईन ऑर्डर करता येते.

अशी केवळ 999 नाणी तयार करण्यात आलेली आहे. एक नाणे खरेदी करण्यासाठी 199 फ्रँक खर्च करावे लागतील. यासोबत एक खास मॅग्नीफाइंग ग्लास देण्यात येईल, ज्याद्वारे अल्बर्ट आइनस्टाइन यांची आकृती पाहता येते. स्विसमिंटने सांगितले की, हे नाणे खूप लक्षपुर्वक बारकाईने बनविण्यात आले आहे. जेणेकरून विश्वविक्रम बनेल.

आइनस्टाइन यांचा जन्म दक्षिण जर्मनी झाला असला तरी त्यांना काही काळ स्विर्झलँडमध्ये घालवला होता. त्यांना स्विर्झलँडची नागरिकता देखील मिळाली होती.

Leave a Comment