इंदिरा जयसिंह सारख्या महिलांच्या पोटीच जन्म घेतात बलात्कारी


बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हीने निर्भयाप्रकरणी वरिष्ठ महिला वकील इंदिरा जयसिंह यांनी केलेल्या विधानावर संताप व्यक्त करताना वादग्रस्त वक्तव्य केले आहे. कंगनाने जयसिंह यांच्यावर अशा महिलांच्या पोटीच बलात्कारी जन्म घेतात, अशा शब्दांत टीकास्त्र सोडले आहे. ‘पंगा’ या चित्रपटाच्या प्रिमियरदरम्यान मुंबईत बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत कंगना बोलत होती.

कंगना इंदिरा जयसिंह यांच्यावर राग व्यक्त करताना म्हणाली, चार दिवस निर्भया प्रकणातील आरोपींसोबत या महिलेला तुरुंगात ठेवायला हवे. या कशा महिला आहेत ज्यांना बलात्कारातील आरोपींवर दया येते. असे नराधम अशा महिलांच्या पोटीच जन्म घेतात, ज्यांना बलात्कारी आणि खून करणाऱ्यांच्या प्रति प्रेम असते.

दरम्यान, निर्भयाच्या आईला या प्रकरणातील आरोपींना माफ करण्याचे वरिष्ठ महिला वकील इंदिरा जयसिंह यांनी ट्विट करीत आवाहन केले होते. त्यांनी यासाठी राजीव गांधी हत्याप्रकरणात सोनिया गांधी यांचे उदाहरण दिले होते. निर्भयाच्या आईने इंदिरा जयसिंह यांच्या वक्तव्यानंतर त्यांना चांगलेच सुनावले होते. त्यांनी म्हटले होते की, इंदिरा जयसिंह कोण आहेत, ज्या मला सल्ला देत आहेत. संपूर्ण देशाची इच्छा आहे की दोषींना फाशी दिली जावी. केवळ यांच्यासारख्या लोकांमुळेच बलात्कार पीडितांना न्याय मिळत नाही.

Leave a Comment