70 वर्ष जुन्या ‘हॅप्पी’ पेटिंगची एवढ्या कोटींना झाली विक्री

ब्रिटिश कलाकार एलएस लॉरीद्वारे 1943 मध्ये बनविण्यात आलेल्या हॅप्पी पेटिंगची तब्बल 2.6 मिलियन पाउंडला (जवळपास 24 कोटी रुपय) विक्री झाली आहे. लंडनच्या क्रिस्टी ऑक्शन हाउसमध्ये या पेटिंगला एका कलेक्टरने खरेदी केले. या पेटिंगचे नाव ‘द मिल’ असे आहे.

लॉरी यांनी या पेटिंगमध्ये इंग्लंडच्या एका औद्योगिक क्षेत्राला दर्शवले आहे. या मध्ये जीवनच्या व्यस्ततेला प्रदर्शित करण्यात आले आहे. मात्र पाहताना ही पेंटिग शनिवार-रविवारच्या दिवसाची दिनक्रम दर्शवत आहे. कारण, लोक ऑफिसला व मुले शाळेत जाताना दिसत नाहीत.

ही पेटिंग डीएनए-रिसर्चमध्ये अग्रगण्य असलेले डॉ. लियोनार्ड डी हॅमिल्टन यांच्याकडे होती. लॉरीने आपल्या पेटिंग करिअरची सुरूवात केली होती, त्यावेळी त्यांनी ही खरेदी केली होती.

ऑक्सफोर्ड युनिवर्सिटीमध्ये मेडिकलचे शिक्षण घेताना देखील त्यांच्याजवळ ही पेटिंग होती. 1949 ला जेव्हा ते अमेरिकेला गेले, त्यावेळी पेटिंग देखील सोबत घेऊन गेले. त्यामुळे हे पेटिंग अस्तित्वात आहे की नाही हेच कोणाला माहिती नव्हते. मागील वर्षी डॉ. हॅमिल्टन यांच्या मृत्यूनंतर ही पेटिंग पुन्हा चर्चेत आली होती.

Leave a Comment