
सॅन फ्रान्सिस्को – दूरसंचार क्षेत्रातील आघाडीची कंपनी व्होडाफोन कंपनीने फेसबुकचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला ‘लिब्रा’ या क्रिप्टोचलन प्रकल्पामधून माघार घेतली आहे.
फेसबुकच्या लिब्रा क्रिप्टोचलनामधून व्होडाफोनची माघार
असोसिएशनची व्होडाफोन ही सदस्य राहिली नसल्याचे लिब्रा असोसिएशनने म्हटले आहे. लिब्राचे देयक व्यवहार मजुबत राहण्याची लिब्राचे प्रशासन आणि तंत्रज्ञान हे खात्री देत असल्याचे असोसिएशनने म्हटले आहे. लिब्रा प्रकल्पाला पेपल, मास्टरकार्ड, व्हिसा, मॅरकॅडो पॅगो, ईबे, स्ट्राईप आणि बुकिंग होल्डिंगने नकारघंटा वाजविली आहे. फेसबुक कंपनीने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये लिब्रा या क्रिप्टोचलनाची सुरुवात करण्यासाठी लिब्रा असोसिएशची स्थापना केली.
कंपन्यांनी लिब्रामधून बाहेर पडण्याचा निर्णय वापरकर्त्यांची गोपनीय माहिती आणि नियामक संस्थांकडून होणारे कठोर परीक्षण यामुळे घेतला होता. त्याच दरम्यान असोसिएशनने लिब्राच्या देयक व्यवहाराची व्यवस्था ही सुरक्षित, पारदर्शी, ग्राहकस्नेही राहण्यासाठी काम सुरू राहणार असल्याचे म्हटले आहे. जगभरातील १,५०० कंपन्यांनी असोसिशएनमध्ये सहभागी होण्यासाठी स्वारस्य दाखविले आहे. लिब्रा ही फेसबुकच्या मालकीचे क्रिप्टोचलन म्हणजे आभासी चलन असणार आहे. त्यामधून वापरकर्त्याला आर्थिक व्यवहार करता येणार आहेत.
