टाटाची बहुप्रतिक्षित प्रिमियम हॅचबॅक टाटा अल्ट्रोज अखेर लाँच झाली आहे. या कारची सुरूवाती किंमत 5.29 लाख रुपयांपासून सुरू आहे. तर याच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 9.39 लाख रुपये आहे.
टाटा अल्ट्रोजला सुरक्षेसाठी 5 स्टार रेटिंग मिळाले आहे. ही सुरक्षा रेटिंग ग्लोबल एनसीएपीने दिली आहे. केवळ 21 हजार रुपयांमध्ये या कारची बुकिंग करता येईल.

टाटा अल्ट्रोजच्या व्हेरिएंटबद्दल सांगायचे तर डिझेल आणि पेट्रोल अशा दोन्ही पर्याय देण्यात आले आहेत. पेट्रोल व्हेरिएंटमध्ये XE -5.29 लाख रुपये, XM – 6.15 लाख रुपये, XT – 6.84 लाख रुपये, XZ – 7.44 लाख रुपये, आणि XZ(O) च्या व्हेरिएंटची किंमत 9.39 लाख रुपये आहे.
डिझेल व्हेरिएंटमध्ये देखील XE – 6,99,000 लाख रुपये, XM- 7,75,000 लाख रुपये, ET – 8,44,000 लाख रुपये, EZ 9,04,000 – लाख रुपये, XZ(O) च्या व्हेरिएंटची किंमत 9,29,000 लाख रुपये आहे.

या कारमध्ये ऑटो हेडलॅम्प, कीलेस एंट्री, पुश बटन स्टार्ट/स्टॉप, 7 इंच ड्युअल टोन एलॉय व्हिल, प्रोजेक्टर हेडलॅम्प, एलईडी डीआरएलएस, रिअरला स्पिलिट एलईडी टेल लॅम्प, एंबिएंट लायटिंग, क्रूज कंट्रोल मिळेल.
सेफ्टी फीचर्समध्ये एबीएससोबत ईबीडी, रिअर पार्किंग सेंसरसोबत कॅमेरा, ड्रायव्हर आणि को-ड्रायव्हर सीट बेल्ट वॉर्निंग आणि हाय स्पीड अलर्ट या फीचर्सचा समावेश आहे.

टाटा अल्ट्रोजमध्ये दोन इंजिन पर्याय आहेत. यामध्ये 1.2 लिटर पेट्रोल इंजिन येते. जे 86 बीएचपी पॉवर देते. दुसरे इंजिन 1.5 लिटर डिझेल इंजिन आहे. जे 90 बीएचपी पॉवर देते. दोन्ही इंजिन बीएस6 मानक आहेत. सोबतच या 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स मिळेल.