जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीची प्रेयसीसह ताजमहलला भेट


नवी दिल्ली – जगातील सर्वात श्रीमंत मानव आणि ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) जेफ बेजोस यांनी आपल्या प्रेयसीसह प्रेमाचे प्रतीक असलेल्या जगप्रसिद्ध ताजमहालला भेट दिली. पांढर्‍या संगमरवरी या वास्तूची बेजोस यांना भूरळ पडली. ते बराच वेळ या वास्तुकडे आकर्षणाने पहात होते. ताजमहालकडे जाणा ऱ्या चिंतनशील तलावाच्या समोर त्याने आपल्या महिला मित्रासोबत फोटो देखील काढले.


यावेळी जेफ बेझोसने क्रीम कलरचा सूट परिधान केला होता, तर त्याची मैत्रीण लॉरेन सान्चेझ नारंगी व पांढरा पोशाख परिधान केला होता. मंगळवारी चार्टर्ड विमानाने जेफ बेजोस काशी (बनारस) येथून आग्रा येथे दाखल झाले. मंगळवारी दुपारी 12 च्या सुमारास ते आपली प्रेयसी लॉरेन सान्चेझसमवेत ताजमहाल येथे पोहोचले.


यापूर्वी मंगळवारी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती जेफ बेजोस यांनी तीर्थक्षेत्र काशी (बनारस) येथे गंगा आरतीस उपस्थित होते. 15 जानेवारीला भारत दौऱ्यावर आलेले जेफ बेजोस आपली गर्लफ्रेंड लॉरेन सान्चेझसमवेत वाराणसीला पोहचले होते. त्यांच्या याबद्दल पूर्णपणे गोपनीयता बाळगण्यात आली होती. विमानतळाचे संचालक आकाशदीप माथूर यांनी त्यांच्यासोबत फोटो देखील काढले आणि सोशल मीडियावर पोस्ट केले तेव्हा त्यांच्या वाराणसी दौर्‍याबद्दल जगाला कळले. जेफ बेजोस वाराणसीत कुठे-कुठे गेले याबद्दल सविस्तर माहिती नाही.

Leave a Comment