या ठिकाणी भरते चक्क ‘क्रुज शाळा’

राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील हल्दीना येथे एक हटके शाळा बांधण्यात आली आहे. येथे एक शाळा खास जहाजेच्या आकाराची बांधण्यात आली आहे. ही शाळा बघायला लांबून लोक येत असून, विद्यार्थी देखील या हटके शाळेतील वर्गात बसण्यास उत्साहित आहेत.

इंजिनिअर राजेश लवानिया या व्यक्तीने सहगल फाउंडेशनच्या मदतीने ही हटके शाळा उभारली. राजकीय उच्च माध्यमिक विद्यालयाच्या सरकारी शाळेचे मुख्याध्यापक बनवारीलाल जाट यांनी सांगितले की, शाळेत 6 वी ते 12 पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकवले जाते. यामध्ये 400 विद्यार्थी शिकतात.

सहगल फाउंडेशनचे महिपाल सिंह यांनी सांगितले की, स्कूलचे रिनोव्हेशन करण्यासाठी जवळपास 40 लाख रुपये खर्च आला. यासाठी ग्रामीण भागातील लोकांनी देखील 2 लाख रुपयांची मदत केली.

हल्दीनाच्या या सरकारी शाळेत बनलेल्या एज्युकेशन क्रुजमध्ये ग्राउंड फ्लोरला स्मार्ट क्लासरूम आहेत. यात 40 विद्यार्थ्यांना बसण्यासाठी फर्निचर व भितींवर 55 इंच एलईडी लावण्यात आलेला आहे. पहिल्या मजल्यावर एक्टिव्हिटी रूम देखील आहे. विद्यार्थ्यांना क्रूजच्या टेरेसवर उभे राहायला देखील आवडते.

इंजिनिअर राजेश लवानियाने सांगितले की, त्यांचे लक्ष्य शाळांना चाइल्ड फ्रेंडली करायचे आहे. शाळेत झालेल्या बदलांमुळे अधिक विद्यार्थी अॅडमिशन घेत आहेत.

Leave a Comment