गगनयान मिशनसोबत इस्त्रो अंतराळात पाठवणार हा बोलका रोबॉट

इस्त्रोचे महत्वकांक्षी मानवी मिशन गगनयानला अंतराळात पाठवण्यासाठी वर्ष 2022 हे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. यासाठी इस्त्रो देखील जोरदार काम करत आहे. गगनयान मिशनसाठी इस्त्रोने खास ‘व्योममित्र’ नावाचा ह्युमनॉइड रोबॉट तयार केला आहे. गगनयाच्या उड्डान घेण्याआधी इस्त्रो ‘व्योममित्र’ला अंतराळात पाठवणार आहे. तो मानवी शरीराच्या घडामोडींचा अभ्यास करेल. हe हाफ ह्युमनॉइड रोबॉट अंतराळातून इस्त्रोला रिपोर्ट पाठवेल.

इस्त्रोने हा व्योममित्र सर्वांसमोर सादर केला आहे. इस्त्रोचे वैज्ञानिक सॅम दयाल यांनी सांगितले की, व्योममित्र अंतराळात एका मानवी शरीराचा अभ्यास करेल व त्याचा रिपोर्ट पाठवेल.

व्योममित्र हा एक खास रोबॉट आहे. जो बोलू शकतो व मनुष्याला ओळखू देखील शकतो. हा रोबॉट अंतराळवीरांद्वारे करण्यात येणाऱ्या हालचालींची नक्कल करू शकतो.

व्योममित्र लोकांनी विचारलेल्या प्रश्नांना देखील उत्तर देऊ शकतो.  या रोबॉटला पाय नसल्याने याला हाफ ह्युमनॉइड म्हटले जात आहे.

दयाल यांनी सांगितले की, हा रोबॉट केवळ पुढे व बाजूला वाकू शकतो. तो अंतराळात काही परिक्षण करेल व कमांड सेंटरशी संपर्क साधेल.

दरम्यान, गगनयान मिशनसाठी निवडण्यात आलेल्या अंतराळ प्रवाशांना रशियामध्ये या महिना अखेरीस ट्रेनिंग देण्यास सुरूवात होणार आहे. या मिशन अंतर्गत अंतराळवीरांना कमीत कमीत कमी 5 ते 7 दिवस अंतराळात पाठवण्याची योजना आहे.

Leave a Comment