सर्वात कमी उंचीच्या व्यक्तीने घेतला जगाचा निरोप


शुक्रवारी 17 जानेवारी रोजी जगातील सर्वात कमी उंचीचा व्यक्ती खगेंद्र थापाचे निधन झाले. थापाचे निमोनिया या आजारामुळे निधन झाले. वर्ष 2010 मध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड पुरस्काराने जगातील सर्वात कमी उंचीचा व्यक्ती म्हणून 27 वर्षाच्या थापाला सन्मानित करण्यात आले होते. 26.3 इंच त्याची उंची होती. तसेच वजन 6 किलो होते.

नेपाळचा रहिवाशी असलेला खगेंद्र थापाचा जन्म 14 ऑक्टोबर 1992 रोजी काठमांडूपासून 200 किलोमीटरपासून लांब असलेल्या पोखरा येथे झाला होता. 2010 मध्ये थापाला 18 व्या वर्षी जगातील सर्वात कमी उंचीचा व्यक्ती म्हणून घोषित करण्यात आले होते. एक वर्षानंतर थापाकडून फिलीपींसच्या जनरे बालाविंगने सर्वात कमी उंचीचा अवॉर्ड आपल्या नावावर करुन घेतला.

खगेंद्रची उंची एवढी कमी होती की जेव्हा त्याचा जन्म झाला तेव्हा तो एका हातात सामावून जायचा, असे त्याचे वडील रुप बहादूर यांनी सांगितले. खगेंद्रला निमोनिया झाला असल्यामुळे त्याला पोखराच्या मणिपाल रुग्णालयात दाखल केले होते. पण उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.

Leave a Comment